वर्तुळाकृती नळी किंवा दोन तारा मिळून केलेली साखळी म्हणजे सरी. मधोमध फासा असतो.सरी चांगली ताठ असून गळ्यालगतच घालतात.
पंढरपूरच्या श्री रुक्मिणी मातेच्या गळ्यातील सर सगळ्या दागिन्यांमध्ये लक्ष वेधून घेतो.जेष्ठ संस्कृती संशोधक रा. चिं. ढेरे यांनी सांगितल्याप्रमाणे विठुराया हा लोकदेव आहे. त्यामुळे त्याच्या अर्धंगिनीच्या गळ्यात हा दागिना खुलणे सहज शक्य आहे.
जैत रे जैत मध्ये स्मिता पाटील ह्यांच्या गळ्यातही सरी सजली आहे.
आपल्या अनोख्या ढंगाने हा दागिना आजच्या आधुनिक स्त्रीलाही हवाहवासा वाटेल यात शंका नाही.
Specifications
1. Earrings included
2. 92.5% Pure Silver with antique polish